चांदवड बाजार समिती बद्दल माहिती

चांदवड बाजार समितीचा विद्यमान कारभार सभापती श्री.संजय जाधव  व उपसभापती श्री.  ,  सचिव   व सर्व संचालक मंडळ यशस्वी पणे पार पाडीत आहे.

चांदवड बाजार समितीचे मुख्य बाजार आवार व बोलठाण , न्यायडोंगरी उपबाजार आवार अस्तित्वात आहे. चांदवड बाजार समितीचे कार्यक्षेत्र एकूण १००  गावे आहेत. सुरूवातीच्या काळात बाजार समितीमध्ये प्रामुख्याने भुसार धान्यमाल तसेच कापूस , भूईमुग शेंगा या नगदी पिकांची आवक असायची . परंतू गेल्या 15 वर्षापासुनचे काळात कांदा व मका शेतमालाची आवक वाढली असून चांदवड बाजार समिती कांदा व मका मालाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात आहे. 

 वडाळी भोई ,वडनेरभैरव,रायपूर  या उपबाजार आवारावर शेतमाल लिलावाचे दैनंदिन कामकाज सुरू आहे.

शेतकरी व व्यापारी यांचे सहकार्यातून लिलावाचे कामकाज सुरू करणेत येवून आज रोजी चांदवड बाजार पेठ कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून नावलौकीक मिळवत असून सदर मुख्य आवाराचे आर्थिक उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 
चांदवड बाजार समिती मध्ये शेतकरी , व्यापारी , हमाल मापारी इ. घटकांचे हिताचे दृष्टीकोनातून कामकाज करणेत येत असून सदर घटकांच्या सहकार्यातून बाजार समितीची प्रगती करणेस बाजार समिती संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे.

बाजार समितीचे ठळक वैशिष्ट्ये

 

 

  1. शेतमाल विक्री नंतर शेतकरी वर्गास कार्यालया मध्ये व्यापारी वर्गातर्फे रोख पेमेंट अदा करणेत येते.
  2. चांदवड यार्डवर स्वच्छ शौचालयाची व्यवस्था.
  3. शेतकरी वर्गासह सर्वांना बाजारभाव कळणे कामी बाजार समितीचे एकूण 29 व्हॉटसअप ग्रुप बनविले असून त्याद्वारे बाजारभावा सह इतर माहिती तंत्रज्ञान शेतकरी वर्गा पर्यंत पोहोचविले जाते.
  4. बाजार समितीचे सर्व प्रशासकिय कामकाज संगणकीकृत झालेले आहे.
  5. कार्यालयीन कामकाजा बरोबरच सौदा पट्टी , काटापट्टी यांचेही संगणकीकरण करणेत आलेले असून काटापट्टी नोंद ही ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.
  6. शेतकरी वर्गा बरोबरच कर्मचारी , व्यापारी , मापारी यांना बाजार समितीने मोबाईल APP उपलब्ध करून दिलेले आहे. यावर बाजार समिती मध्ये झालेले त्यांचे बाबतीतील सर्व व्यवहार बघू शकतात.